आपली चावडी – 7/12 फेरफार नोटीस / स्टेटस

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने “आपली चावडी” नावाचं एक डिजिटल पोर्टल सुरू केलं आहे, ज्यावर आपण आपल्या गावातील जमीनसंबंधित महत्वाच्या फेरफार नोटिसेस पाहू शकता. यामध्ये 7/12 उतारा (सातबारा फेरफार), मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड फेरफार), मोजणी नोटिसेस, स्वामित्व नोटिसेस, eQJCourt नोटिसेस आणि पिक पाहणीची माहिती उपलब्ध आहे.

आपली चावडी म्हणजे काय?

पूर्वी जमिनीची खरेदी-विक्री झाल्यावर तलाठी किंवा तहसील कार्यालयात नोटीस बोर्डावर पंधरा दिवसासाठी हरकतींसाठी सूचना लावली जात असे. आता ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून, आपली चावडी पोर्टलवर सर्व नोटिसेस डिजिटल स्वरूपात पाहता येतात. या पोर्टलवर प्रदर्शित झालेल्या नोटिसेससाठी 15 दिवसांच्या आत हरकत नोंदवता येते.

aapli chawdi

7/12 फेरफार माहिती कशी पहावी?

  1. digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi ही वेबसाईट उघडा.
  2. “सातबारा (फेरफार)” हा पर्याय निवडा.
  3. जिल्हा, तालुका, गाव निवडा.
  4. कॅप्चा योग्यरीत्या भरा आणि “आपली चावडी पहा” या हिरव्या बटणावर क्लिक करा.
  5. निवडलेल्या ठिकाणासाठी फेरफार नोटिसेसची यादी दिसेल. संबंधित नोटीससमोरील “पहा” बटणावर क्लिक करून सर्व माहिती पाहू शकता.
7/12 फेरफार

नोटीसमध्ये काय दिसेल?

  • फेरफार क्रमांक
  • फेरफार प्रकार (खरेदी, बोजा, बोजा कमी करणे, आदेश/दस्तावेज, हक्क सोड पत्र, वारस, वाटणीपत्र इ.)
  • फेरफार दिनांक
  • हरकतीची अंतिम तारीख (फेरफार दिनांकानंतर 15 दिवस)
  • सर्वे नंबर / गट क्रमांक
  • विक्रेता व खरेदीदारांची नावे
  • खरेदी दस्त क्रमांक आणि किंमत
  • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 कलम 150(2) अन्वये सूचना

मालमत्ता पत्रक (Property Card) कसे पहावे?

  1. त्याच वेबसाईटवर “मालमत्ता पत्रक (फेरफार)” निवडा.
  2. विभाग, जिल्हा, कार्यालय, गाव निवडा.
  3. कॅप्चा भरा आणि शोधा.
  4. नोटीस यादीत फेरफार क्रमांक, प्रकार, दिनांक, अंतिम तारीख, नगर भूमापन क्रमांक इ. तपशील मिळेल.
  5. “पहा” क्लिक करून पूर्ण माहिती मिळेल.

मोजणी नोटिसेस

  1. “मोजणी (नोटिसेस)” पर्याय निवडा.
  2. जिल्हा, तालुका, गाव निवडा.
  3. कॅप्चा भरून शोधा.
  4. सर्वे नंबर / गट क्रमांकानुसार मोजणी नोटिसेस दिसतील.

स्वामित्व नोटिसेस

  1. “स्वामित्व (नोटिसेस)” पर्याय निवडा.
  2. जिल्हा, तालुका, गाव निवडा.
  3. कॅप्चा भरून शोधा.
  4. Notice A आणि Notice B प्रकारच्या स्वामित्व नोटिसेस दिसतील.

Leave a Comment