महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राज्यातील नागरिकांना जमिनीच्या विविध नोंदणीची माहिती घरबसल्या मिळावी आणि त्यांचा तहसील कार्यालय तसेच तलाठी कार्यालयांमधील फेरफटका वाचावा यासाठी महाभुलेख नावाची वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील जमिनींच्या नोंदी ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळे आपल्याला घरबसल्या सातबारा उतारा, 8अ उतारा, मालमत्ता पत्रक तसेच भू नकाशा चेक करता येऊ शकतो. संगणक किंवा मोबाईलच्या मदतीने संबंधित दस्तावेज चेक करता येऊ शकतात.
महत्त्वाचे मुद्दे:
1. डिजिटल पद्धतीने घरबसल्या सातबारा उतारा
2. महाराष्ट्र राज्य शासनाची ऑफिशियल वेबसाईट
3. जमिनीचा फेरफार, माहिती नोटीस तसेच इतर बाबी चेक करता येणार
4. महा भू नकाशा च्या माध्यमातून ऑनलाईन नकाशा
5. मालमत्ता पत्रक, 8 अ उतारा तसेच क पत्रक चेक करता येणार
6. महाराष्ट्र राज्यातील सर्व गावांची गट क्रमांक तसेच सर्वे नंबर क्रमांक अनुसार नोंदणी चेक करता येणार
Digital 7/12 Utara, 8-A Utara, Property card
डिजिटल सातबारा उतारा हा जमिनीची नोंदणी चेक करण्यासाठी उपयुक्त असतो तसेच याच्या माध्यमातून जमिनीची विविध माहिती प्राप्त होते. डिजिटल सातबारा चेक करण्यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब करणे
1. राज्य शासनाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या अधिकृत पोर्टल वरती जा – bhulekh.mahabhumi.gov.in

2. तुम्हाला जिल्हा निवडण्याचा विकल्प मिळेल तिथे जिल्हा निवडा, त्यानंतर तालुका आणि गाव निवडा
3. नावानुसार तसेच सर्वे नंबर किंवा गट क्रमांक नुसार सातबारा उतारा चेक करण्यात येतो जर तुम्हाला तुमचा सर्वे नंबर माहित असेल तर तुम्ही आधीपासूनच सिलेक्ट असलेला पर्याय निवडलेला असू द्या
4. जर तुम्हाला नावानुसार सातबारा उतारा चेक करायचा असेल तर तिथे योग्य विकल्प निवडा
5. नावानुसार सातबारा उतारा नोंदणी चेक करण्यासाठी विविध विकल्प आहेत ज्यामध्ये प्रथम नाव, मधले नाव, आडनाव तसेच संपूर्ण नावाचा उपयोग करून सातबारा उतारा बघता येतो.

6. योग्य रकाने मध्ये तुमचे नाव भरून शोधा नावाच्या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या पुढे विविध नाव येतील.
7. आलेल्या लिस्ट मधून तुमचे नाव सिलेक्ट करा
8. तुमचा योग्य मोबाईल क्रमांक टाका
9. योग्य भाषा निवडा ज्यामध्ये मराठी भाषा अधिक सिलेक्ट करण्यात आली आहे

10. योग्य पद्धतीने सांकेतिक क्रमांक किंवा कॅपच्या भरा आणि पुढे जा
11. तुमच्यापुढे एक नवीन पेज उघडलेले असेल त्यामध्ये सातबारा उतारा तुम्हाला दिसेल तो उतारा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता तसेच त्यावरील विविध नोंदी बघू शकता

महत्त्वाचे: एक गोष्ट लक्षात असू द्या ऑनलाइन सातबारा उतारा किंवा मालमत्ता पत्रक तसेच आठ उतारा हा कोणत्याही शासकीय कामकाजासाठी वापरण्यात येत नाही जर तुम्हाला शासकीय कामासाठी सातबारा उतारा हवा असेल तर तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालय किंवा योग्य ऑफिस मध्ये संपर्क साधावा
Maha Bhulekh Mahabhumi | भूमी अभिलेख महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राज्यातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतात ज्यामध्येच ऑनलाईन पद्धतीने सातबारा तसेच इतर दस्तावेज बघण्यासाठी महाभुलेख हे संकेतस्थळ राज्याच्या वतीने सुरू करण्यात आले आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा सातबारा उतारा 8अ उतारा तसेच इतर दस्तावेज चेक करू शकतात हे संकेतस्थळ एक मोफत संकेतस्थळ आहे ज्यामध्ये इंटरनेटच्या मदतीने फक्त मोबाईल नंबर आणि उपयुक्त माहितीचा वापर करून जमिनीच्या संबंधातील सर्व कामाची माहिती ऑनलाईन पद्धतीने चेक करता येते.
राज्यातील नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले महाभुलेख हे संकेतस्थळ एक महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे यामध्ये नागरिक आधीच जमिनीची सर्व माहिती चेक करू शकतात त्यामुळे फसवणूक होण्याचा धोका कमी होतो.
Nashik (नाशिक) | नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, धुळे |
Aurangabad (औरंगाबाद) | हिंगोली, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, परभणी, जालना, उस्मानाबाद |
Pune (पुणे) | सोलापूर, सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर |
Kokan (कोकण) | मुंबई उपनगर, रायगड, मुंबई शहर, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
Nagpur (नागपूर) | वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली |
Amravati (अमरावती) | अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला |
ऑनलाईन सातबारा मध्ये तफावत असल्यास काय करायचे?
जर तुम्हाला ऑनलाईन सातबारा मध्ये तफावत आढळून आलेली असेल तर सातबारा उतारा मध्ये बदल करण्यासाठी तुम्ही तलाठी कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज दाखल करू शकता किंवा ऑफलाइन पद्धतीने तलाठी कार्यालयाला भेट देऊन आपले सातबारा उतारा मधील तफावत दूर करू शकता.
लक्षात असू द्या ऑनलाइन पद्धतीने मिळणारे दाखले हे फक्त माहितीसाठी देण्यात येतात आणि कधी कधी त्यामध्ये लेटेस्ट डाटा अपलोड होण्यासाठी काही काळ लागू शकतो.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख कार्यालय तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल समोर, पुणे दूरध्वनी : ०२०-२६०५०००६,
ई-मेल : dlrmah.mah[at]nic[dot]in